Eknath Shinde thane

राष्ट्रवादीला मोठा धक्का ! गोंदियाच्या नगराध्यक्षांसह 15 नगरसेवक शिंदे गटात दाखल

948 0

ठाणे : महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राष्ट्रवादी (NCP) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या गोंदियातील नगराध्यक्षासह 15 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे गोंदियात शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या सर्वांच्या अंगावर भगवा शेला टाकत त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे गोंदियातील (Gondia) दोन नगराध्यक्ष, 15 नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महिला कार्यकर्त्याही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या पक्षप्रवेशामुळे गोंदियात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. सडक अर्जुनी नगर पंचायत आणि अर्जुनी नगरपंचायतमधील (Arjuni Nagar Panchayat) 15 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे. तसेच दोन बांधकाम सभापती आणि बाकी वॉर्ड सदस्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!