Pune News

Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

505 0

पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पोहण्यासाठी इंद्रायणी नदी पात्रात उतरलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. साजिद शरीफ बागवान (वय 20 वर्ष राहणार निगडी ओट्टास्कीम) तर आतीक शरीफ बागवान (वय 15 वर्ष राहणार जळगाव) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, शरीफ व अतीक हे दोघे पिंपरी चिंचवड परिसरात फळ विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. ऊन जास्त असल्याने काल दुपारी 3 वा सुमारास दोघे ही सुट्टी घेऊन कुंड मळा येथील इंद्रायणी नदीच्या पात्रात पोहोण्या साठी पाण्यात उतरले होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले त्याचबरोबर वन्यजीव रक्षक संस्था मावळ चे निलेश गराडे ,प्रशांत भालेराव, गणेश गायकवाड, यांनी सदरच्या नदीपात्रात या दोघांचा शोधत सुरू केला. तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांचे मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

Sushma Andhare : सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!