Pune News : ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी 200 कोटींचा विशेष निधी मंजूर

481 0

पुणे : शहरातील (Pune News) पूरस्थिती नियंत्रणासाठी नाले आणि सीमा भिंती उभारणे, या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी राज्य सरकारने तब्बल 200 कोटी रुपयांचा विशेष निधी पुणे महापालिकेस उपलब्ध करुन दिला आहे. या संदर्भात विशेष निधी मिळावा, यासाठी मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर तातडीने निर्णय घेत हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. शिवाय संदर्भातील शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पुणे शहरातील नाल्यांची कामे आणि सीमा भिंती बांधणे यासाठी महापालिकेचा निधी तांत्रिक अडचणींमुळे खर्च करता येत नव्हता. त्यामुळे सीमा भिंतींची कामे रखडली होती. नाला परिसरातील नागरिकांमध्ये पाऊस काळात चिंतेचे वातावरण होते. म्हणून या कामासाठी राज्य सरकारच्या विशेष निधीची आवश्यकता होती.

मोहोळ यांनी फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन ‘महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या अंतर्गत 200 कोटी रुपये मंजूर करुन घेतले आहेत. उपलब्ध झालेल्या निधीमुळे शहरातील नाल्यांच्या कडेने संरक्षण/सीमा भिंती बांधल्या जाणार असून विशेषतः आंबील ओढा परिसराला याचा मोठा फायदा होणार आहे. या सीमा भिंतींमुळे पूरपरिस्थितीत पाणी प्रवाही राहण्यास मदत होणार आहे.

मोहोळ म्हणाले, ‘कमी वेळेत अधिक पाऊस झाल्याने 2019 साली आंबिल ओढा परिसरात दुदैवी घटना घडली, त्यात वित्त आणि मनुष्यहानी झाली. असा प्रकार टाळण्यासाठी सीमा भिंतींची कामे महत्त्वाची ठरणार होती. त्यासाठी आपल्या पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध झाला, याचे नक्कीच समाधान आहे. मा. देवेंद्रजींचे पुणे शहराकडे विशेष लक्ष असल्याचे या निधीच्या मंजुरीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे’

‘हा निधी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद’, असेही मोहोळ म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : आंबेडकरांची निवडणूक लढवण्याची ऑफर, जरांगेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

BCCI Central Contract : BCCI कडून केंद्रीय करार जाहीर

Loksabha Elections 2024 : वंचितने मविआच्या बैठकीत केल्या ‘या’ 4 मागण्या

Accident News : मुंबई अहमदाबाद हायवेवर टँकरने पोलीस व्हॅनला चिरडलं

Manoj Jarange Patil : ‘आता माफी नाही’, भाजपच्या ‘या’ नेत्याने मनोज जरांगेंना दिला इशारा

Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपीचा मृत्यू

ST Employees : एसटी कामगारांच्या आंदोलनाला यश; शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Madhuvanti Patankar : राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना मातृशोक; मधुवंती पाटणकर यांचे निधन

Shobha Dhariwal : रसिकशेठ यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती वितरण व रक्तदान शिबीराचे आयोजन; शोभा धारीवाल

Indian Railways : प्रवाशांना मोठा दिलासा ! रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात

Jayant Patil : कुठेही ‘गट’ या शब्दाचा उल्लेख करू नये; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची विनंती

Ashok Saraf : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

Fake Currency : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर

Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी

Food Poisoning : खळबळजनक ! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत सापडले मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!