पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये तरुणांनी घरातच बनावट चलनी नोटा (Fake Currency) छापल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपी सह एका अल्पवयीन गुन्हेगाराला अटक केली आहे.तिघांकडून 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे छापलेल्या या नोटांची उत्कृष्ठ क्वॉलिटी पाहून पोलिसदेखील पूर्णपणे चक्रावून गेले.
काय घडले नेमके?
शुक्रवारी दुपारी बोडकेवाडी फाटा, माण हिंजवडी रोड येथे पोलीसांनी ही कारवाई केली. तेव्हा मुख्य आरोपी अभिषेक राजेंद्र काकडे, ओंकार रामकृष्ण टेकम अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयटी पार्क हिंजवडी मधून माण गावात जाणाऱ्या रस्त्यावर बोडकेवाडी फाटा येथे संशयितरित्या तिघेजण थांबले होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बनावट चलनी नोटा आहेत अशी माहिती हिंजवडी पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती.
या माहितीच्या आधारे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन तिघांना जेरबंद केलं. तिघांकडे असलेल्या गाडीच्या डिकीमध्ये 500 रुपयांच्या 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या चलनी नोटा आढळून आल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या मात्र नोटावरील क्रमांक हे एक सारखेच असल्याचे दिसून आले त्यावरून या नोटा बनावट असल्याचे उघडकीस आले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर
Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी