पुणे : कात्रज प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याला जेरबंद केल्यानंतर पुणेकरांनी (Pune News) सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र तरीदेखील अजून लोकांच्या मनातून बिबट्याची दहशत आहे. सध्या एक घटना समोर आली आहे. यामध्ये तीन बिबटे एकाचवेळी आढळून आले आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एकाच वेळी तीन-तीन बिबट्यांचं दर्शन झाले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
काल मध्यरात्री नारायणगाव येथील जुन्नर-नारायणगाव रोडवरील श्री साईबाबा मंदिराजवळ असलेल्या धनंजय राजेंद्र दरंदळे यांच्या घराजवळ 3 बिबट्या फिरताना दिसले. हे बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एक त्यानंतर त्याच्यामागून आणखी दोन बिबट्या दिसतात.
तिन्ही बिबट्या एकत्र जाताना दिसतात. पुढे हे तिन्ही बिबट्या एकत्र एका घरासमोर दिसतात. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे नागरिकांनी या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Loksabha Election : उद्या दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होणार
Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेसाठी आज अंतिम मुदत
Jalgaon News : शिवलिंग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू
Suhas Patil : इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील
Pune Fire : पुण्यात गॅरेजमधील 17 चारचाकी वाहनांना भीषण आग
Svastikasana : स्वस्तिकासन म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?