Pune News

Pune News : बुधवार पेठेतील छापेमारीत 7 बांगलादेशी महिलांना अटक

730 0

पुणे : पुण्यातील (Pune News) बुधवार पेठेत सामाजिक सुरक्षा विभागाकडून छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत बुधवार पेठेतील 7 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिलांशी फेसबुकवर ओळख करून तुझी भारतात त्वचारोगाची ट्रीटमेंट करू, असं आमिष दाखवून फसवणूक केली जात होती. मागील काही दिवसांपासून पुण्यातील बुधवार पेठ परिसरामध्ये राहणाऱ्या महिलांवर पुणे पोलिसांची नजर आहे. बांगलादेशी महिलांवर कारवाईची सामाजिक सुरक्षा विभागाची एक महिन्यात तिसरी कारवाई करण्यात आली आहे.

या महिलांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे भारतात येण्याचा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे बुधवार पेठेतील कुंटणखाना चालवणाऱ्या महिलांना सामाजिक सुरक्षा पथकाने केली अटक केली आहे. कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेवरदेखील पीटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!