EVM

Pune Loksabha : पुण्यातील मतदानासाठी 6054 तर इतर 11 मतदारसंघांसाठी 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध; कुठल्या मतदारसंघात किती बॅलेट लागणार

219 0

पुणे : उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यासाठी तब्बल 23 हजार 284 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. तसेच यात्रा मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाने एकूण 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.

निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पुणे मावळ शिरूर सह राज्यातील औरंगाबाद, नंदुरबार, रावेर, जालना, बीड, जळगाव, अहमदनगर आणि शिर्डी या एकूण 11 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्यासाठी 29 हजार 284 मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांसाठी एकूण 53 हजार 959 बॅलेट युनिट, 23 हजार 284 कंट्रोल युनिट आणि 23 हजार 284 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

पुण्यातील मतदान केंद्रांसाठी 6054 बॅलेट युनिट आणि 2018 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट उपलब्ध केले असून मावळमधील 2566 मतदान केंद्रांसाठी 7698 बॅलेट युनिट आणि 2566 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट तर शिरूरमधील 2509 मतदान केंद्रांसाठी 7527 बॅलेट युनिट आणि 2509 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट उपलब्ध केलेले आहेत. या सर्व साहित्याचे वितरणही रविवारी सकाळपासून सुरू झाले आहे. त्याचबरोबर इतर आठ मतदारसंघांपैकी औरंगाबादमधील 2040 मतदान केंद्रांसाठी 6120 बॅलेट युनिट आणि 2040 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, नंदुरबारमधील 2115 मतदान केंद्रांसाठी 2115 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट, रावेरमधील 1904 मतदान केंद्रांसाठी 3808 बॅलेट युनिट तर 1904 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, बीडमधील 2355 मतदान केंद्रांसाठी 7065 बॅलेट युनिट आणि 2355 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, जळगावमधील 1982 मतदान केंद्रासाठी 1982 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट, अहमदनगरमधील 2026 मतदान केंद्रांसाठी 4052 बॅलेट युनिट आणि 2026 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, शिर्डीमधील 1708 मतदान केंद्रांसाठी 3416 बॅलेट युनिट आणि 1708 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट तर जालनामधील 2061 मतदान केंद्रांसाठी 4122 बॅलेट युनिट आणि 2061 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune Crime : सिंहगड रोड परिसरात घरफोडी करणारे सराईत अटकेत; आरोपींकडून 19 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

Pune Loksabha : मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास निश्चित केलेले १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य; यादी केली जाहीर

IPL : KKR ला मिळाले प्लेऑफचे तिकीट; प्लेऑफमध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ

Pune Loksabha : पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या 1500 तक्रारींवर केली कार्यवाही

Pune Loksabha : लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार राहणार बंद

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!