Pune Crime

Pune Crime : पत्नीने पतीला घाबरवण्यासाठी अंगावर पेट्रोल ओतले मात्र तिचाच घात झाला

547 0

पुणे : पुण्यामध्ये (Pune Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये छळास कंटाळून पेट्रोल ओतून घेतलेल्या महिलेला पतीने पेटवल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. या घटनेत पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
अमृता अक्षय कुंजीर असे पीडित महिलेचे नाव आहे. अमृता आणि अक्षय कुंजीर यांचे 2020 मध्ये लग्न झाले आहे.अक्षय दारू पिऊन पत्नीला मारहाण करत होता. अक्षयने घटनेच्या दिवशी म्हणजेच 12 सप्टेंबरला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दारुच्या नशेत घरातील सामानाची तोडफोड केली. त्यानंतर पत्नीला घरातून निघून जा,असे सांगितले. त्यावर पत्नीने छळास कंटाळून मी मरुन जाते, असे म्हणत घरात शेतीपंपासाठी आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. त्यावेळी अक्षयने काडीपेटीने आग लावून अमृताला पेटवून दिले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पेट्रोलमुळे आगीचा भडका उडाला. त्यानंतर अक्षयनेच अमृताच्या अंगावर पाणी ओतून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत भाजल्याने अमृताची छाती, गळा आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर अमृताला उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर अमृताची सासू आशा कुंजीर यांनी हा प्रकार कोणाला सांगू नको, असे म्हणत सुनेला दमदाटी केली होती. तू जर तुला पतीने पेटवले, असे सांगितले तर दवाखान्यात उपचार करणार नाही, अशी भीती सासूने घातली. त्यामुळे घाबरलेल्या अमृताने चुलीवर स्वयंपाक करताना अचानक पेट्रोल ओतले गेल्याने भडका होऊन भाजले असे स्टेटमेंट लोणी काळभोर पोलिसांना दिले. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी अमृताची कसून चौकशी केली असता तिने घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सासू आशा कुंजीर आणि अक्षय कुंजीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!