पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे (Pune Crime News) प्रमाण खूप वाढले आहे. पुण्यातील (Pune Crime News) वानवडी परिसरात एका टोळक्याने तरुणाचा दगडाने ठेचून खून केला आहे. शनिवारी पहाटे काळेपडळ संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे वानवडी परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तरुणाची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
महादेव रघुनाथ मोरे (वय-25 रा. काळेपडळ) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे हि हत्या 5अल्पवयीन तरुणांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा खून नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.