Murder

Pune Crime : धक्कादायक ! पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा

535 0

पुणे : पुण्यातील (Pune Crime) आळंदीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे. त्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव या दोघांनी रचला. मात्र, हा बनाव जास्त काळ टीकला नाही. हा बनाव उघडकीस येताच आळंदी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या दिराला अटक केली. चर्‍होली येथील थोरवेवस्तीत रविवारी (दि. 28) मध्यरात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

हुजूर महंमूद सय्यद (वय 32, रा. थोरवेवस्ती, चर्‍होली) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. सय्यद यांची 28 वर्षीय पत्नी आणि तिचा दीर फिरोज महंमूद सय्यद (वय 38, रा. मासाला खुर्द, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अनिल लोहार यांनी फिर्याद दिली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
थोरवेवस्तीत एका व्यक्तीने आत्महत्या केल्याबाबत आळंदी पोलिसांना रविवारी मध्यरात्री माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हुजूर सय्यद यांच्या घरी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. या वेळी हुजूर हे मृतावस्थेत होते. त्यांनी घरात भिंतीला धडक घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांना संशय आल्याने खुनाच्या अनुषंगाने चौकशी केली. हुजूर यांना झालेली जखम, घटनास्थळावरील परिस्थिती आणि त्यांच्या मुलीने दिलेली माहिती ही हुजूर यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीशी सुसंगत नव्हती. तसेच पत्नीने घरातील रक्ताचे डाग साफ केले होते. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता हुजूर यांची पत्नी आणि दीर फिरोज या दोघांनी मिळून त्यांचा खून करून हत्याराची विल्हेवाट लावल्याचे तपासात उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी आणि दीर फिरोजला अटक केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune News : जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘माय फस्ट सेल्फी वोट’ स्पर्धेचे आयोजन

ISRO : चंद्रावर अपेक्षेपेक्षा 5 ते 8 पट अधिक पाणी; ISRO च्या अभ्यासात मोठा खुलासा

Sangli Loksabha : सांगलीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट ! ‘या’ नाराज काँग्रेस नेत्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’तर्फे वेद विज्ञान महाविद्यापीठास स्कूल बस भेट

Accident News : कराड चिपळूण महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात; मोठ्या प्रमाणात झाली गॅस गळती

Loksabha : भाजपमध्ये जाण्यासाठी ‘ते’ दोन नेते रोज शरद पवारांना फोन करायचे; जितेंद्र आव्हाड यांचा मोठा गौप्यस्पोट

Loksabha : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीवर भाजपकडून आक्षेप

Nashik News : हृदयद्रावक ! सख्ख्या बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू

Weather Update : हाय गर्मी ! हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Devendra Fadnavis : शरद पवारांना मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता लागला भाजपच्या गळाला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!