शंकर महाराज मठ, सातारा रोड येथे दि. २० जून २०२४ रोजी दर्शनासाठी गेलो असतांना भाजपाचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, त्यांचा भाऊ महेश शिळीमकर व त्यांच्या दोन मुलांनी जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद चेतन आरडे, रा. तळजाई वसाहत, पुणे यांनी दिली होती. त्यानुसार सहकार नगर पोलीस स्टेशन येथे भाजपाचे पुणे सरचिटणीस(महामंत्री) राजेंद्र शिळीमकर, त्यांचा भाऊ महेश शिळीमकर व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध दि.१४ ऑगस्ट २०२४ रोजी भा.द.वि. क. ३२३,५०४,५०६, ३४ व तसेच ॲट्रॉसिटी कायदाचे कलम ३(१) (आर), ३(१)(एस) व ३(१)(वाय) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार
” फिर्यादी चेतन प्रभाकर आरडे हे दि.२० जून रोजी सातारा रस्त्यावरील शंकरबाबा महाराज मठ येथे माजी नगरसेवक महेश वाबळे यांच्या समावेत दर्शनासाठी गेले होते. तेव्हा तेथे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी रुद्राभिषेक पूजा चालू होती. यावेळी फिर्यादी आरडे यांनी पूजेच्या खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर व इतर यांनी त्यांना आत जाऊ दिले नाही.. त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच लाथा बुक्यांनी मारहाण देखील केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.”
सदर गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्याकामी राजेंद्र शिळीमकर, महेश शिळीमकर व त्यांच्या दोन्ही मुलांनी विशेष सत्र न्यायालयात *अॕड.* *अतुल पाटील* यांचेमार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. *”सदरचा गुन्हा हा राजकीय हेतूने प्रेरित असून राजेंद्र शिळीमकर यांची राजकीय कारकीर्द कलंकीत करण्याचा डाव आहे, तसेच राजकीय दबाव वापरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे” असा युक्तिवाद अर्जदारांच्या वतीने अॕड. अतुल पाटील यांनी केला.* सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांचे व फिर्यादीच्या वकिलांचे म्हणणे ऐकून मे. विशेष सत्रन्यायाधीश श्री. नरवडे साहेब यांनी दि.३० ऑगस्ट २०२४ रोजीच्या आदेशान्वये सर्व आरोपींना काही अटी व शर्तींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
सदर कामी अॕड. अमोल शेळके, अॕड. आदित्य जाधव व अॕड. ऋषीकेश गव्हाणे यांनी मदत केली.