शिवजयंती निमित्त मिरवणूक काढण्याची परवानगी द्यावी, प्रशांत जगताप यांची मागणी

274 0

पुणे- यंदा शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी मिरवणुकीला परवानगी द्यावी अशी विनंती राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत प्रवक्ते प्रदीप देशमुख, शिवजयंती उत्सव समितीचे अमित गायकवाड उपस्थित होते. मागील दोन वर्षे सातत्याने कोविड निर्बंध असल्याने शिवजयंती उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. या वर्षी रुग्णसंख्या मर्यादित असल्याने शिवजयंती उत्साहात साजरी व्हावी अशी सर्व शिवप्रेमींची इच्छा आहे. त्यामुळे यंदा शिवजयंती निमित्त मिरवणूक काढण्याची परवानगी मिळावी अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली.

Share This News
error: Content is protected !!