DRDO चे माजी संचालक प्रदीप कुरुलकरनं पाकिस्तानला माहिती पुरवल्याचं तपासातून उघड; एटीएसकडून चार्जशीट दाखल

410 0

डीआरडीओचे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. कुरुलकर याने पाकिस्तानी हेरांना गोपनीय माहिती पुरवल्याचं पोलीस तपासात उघड झालं.

हनी ट्रॅपमध्ये अडकून झारा दासगुप्ता या पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती दिल्याच्या आरोपावरून डॉ. प्रदीप कुरुलकर याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ४ मे २०२३मध्ये अटक केली.

एटीएस ने कुरुलकर विरोधात आरोपपत्र दाखल केले असून, त्यात कुरुलकर याने पाकिस्तानी हेरांना कशा पद्धतीने माहिती पाठवली याबाबतचे आरोप ठेवण्यात आले आहेत. सध्या कुरुलकर कारागृहात आहे. कुरुलकरने वकिलांमार्फत जामिनासाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून, हा अर्ज प्रलंबित आहे.

Pradeep Kurulkar News Update: डॉ. प्रदीप कुरुलकरांनी मोबाइलमधील डेटा केला होता डिलीट, तपासात धक्कादायक माहिती समोर

Pradeep Kurulkar : कुरुलकर चक्क गेस्ट हाऊसमध्ये भेटायचा महिलांना; तपासात आले समोर

Pradeep Kurulkar : हनीट्रॅप प्रकरणात DRDO कडून घडली ‘ही’ मोठी चूक

डीआरडीओ चे संचालक प्रदीप कुरूलकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Share This News
error: Content is protected !!