PMPML

PMPML : PMPMLच्या सतत गैरहजर राहणाऱ्या 36 कर्मचाऱ्यांचं थेट निलंबन

507 0

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) आपल्या कर्मचार्‍यांच्या वर्तणुकीशी संबंधित समस्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेत थेट 36 कर्मचार्‍यांना वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल निलंबित केले आहे. याशिवाय, पीएमपीएमएलचे (PMPML) नवनियुक्त अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) सचिंद्र प्रताप सिंग यांनी तीन कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश जारी केले आहेत.

Pune PMPML : बस चालकाने अरेरावी केली तर या नंबरवर कॉल करा अन् मिळवा 100 रुपयांचं बक्षीस

“पीएमपीएमएलच्या (PMPML) जास्तीत जास्त बस रस्त्यावर धावतील, प्रवाशांना कमी गैरसोयीचा सामना करावा लागेल, कर्मचाऱ्यांची गैरहजरी कमी व्हावी यासाठी आणि पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे”, असे पीएमपीएमएलने आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

वारंवार गैरहजर राहणाऱ्या PMPML कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा
पीएमपीएमएलच्या म्हणण्यानुसार, सीएमडीने 30 कंडक्टर आणि 6 ड्रायव्हरसह 36 कर्मचार्‍यांचे निलंबनाचे आदेश जारी केले आहेत जे यापूर्वी अनेक प्रसंगी ड्युटीवर गैरहजर राहिले आहेत. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहिल्याबद्दल 78 कंडक्टर आणि 64 ड्रायव्हरसह 142 कर्मचाऱ्यांना नोटिस बजावण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!