हडपसर ते वीर गाव पीएमपीएमएलच्या नवीन बसमार्गाचे उदघाटन

272 0

पुणे- हडपसर ते वीर गाव दरम्यान पीएमपीएमएलच्या नवीन बसमार्गाचे उदघाटन मंगळवारी (दि. १) करण्यात आले. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्या हस्ते श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराच्या प्रांगणात या बससेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ, सचिव अभिजीत धुमाळ, खजिनदार अमोल धुमाळ, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप धुमाळ, सरपंच माऊली वचकल, पीएमपीएमएलचे हडपसर डेपो मॅनेजर सुभाष गायकवाड, असिस्टंट डेपो मॅनेजर मोहन दडस, पुणे म्युनिसिपल कार्पोरेशन बँकेचे संचालक सुनील पोमण, महादेव पोमण, संजय पवार उपस्थित होते.

फुलांची आकर्षक सजावट केलेल्या पीएमपीएमएलच्या बसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वीर गाव ते सासवड दरम्यान फटाके वाजवून व ढोलताशांच्या गजरात बससेवेचे स्वागत करण्यात आले.

यावेळी दत्तात्रय झेंडे म्हणाले, ” सध्या या बसमार्गावर ३ बसेसद्वारे बससेवा उपलब्ध आहे. सासवडहून साधारणपणे दर ५० मिनिटांनी बससेवा उपलब्ध असेल. हडपसर ते वीर १२ खेपा व सासवड ते वीर १६ खेपा होणार आहेत. या परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी यांच्यासह श्रीनाथ म्हस्कोबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चांगली सोय होणार आहे. प्रवाशी प्रतिसाद व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढविण्यात येतील. जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा”

सदरची बस सेवा सुरू झाल्यामुळे वीर, परिंचे, पांगारे, पिंपळे पोमणनगर, यादववाडी तसेच वीर ते सासवड दरम्यान असणाऱ्या गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून आम्हाला या बस सेवेमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले.

Share This News

Related Post

पिंपरी पालिकेतील भाजपचे नगरसेवक केशव घोळवे यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक (व्हिडिओ)

Posted by - February 2, 2022 0
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने 55 हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक केशव घोळवे यांना…

अटीशर्थींचा भंग केल्यानं रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करा; चित्रा वाघ उद्या पुण्याच्या शिवाजीनगर पोलिसांत नोंदवणार जबाब

Posted by - May 1, 2022 0
शिवसेना नेते रघुनाथ कुचिकप्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ उद्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाणार आहेत. कुचिक प्रकरणात चित्रा वाघ यांचा उद्या…

पुण्यात धुव्वाधार पावसानंतर कुठे घडल्या झाडपडीच्या घटना पाहा…

Posted by - June 10, 2022 0
मागील काही दिवसांपासून हुलकावणी देत असलेला वरुण राजा आज पुणेकरांवर प्रसन्न झाला असून सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पुण्यात धुव्वादार पावसानं…

आकुर्डीत पालखी आगमनापूर्वी विकासकामांसाठी तरतूद करावी, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Posted by - May 19, 2022 0
पिंपरी- जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी पुढील महिन्यात 21 जून रोजी शहरात येत आहे. दरवर्षी पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे…

राष्ट्रवादीपाठोपाठ भाजपात भाकरी फिरली! प्रदेश कार्यकारिणी जाहीर

Posted by - May 3, 2023 0
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असं सूचक विधान करत नुकताच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *