पिंपरी- चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय

616 0

पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे 18 उमेदवार निवडून आले आहेत. गावडे पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांना एकूण 2534 मते मिळाली. तर त्यांच्याविरुद्ध उभे राहिलेले अंबर चिंचवडे यांना 2525 मते मिळाली आहेत. परंतु अंबर चिंचवडे यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी अध्यक्षपदाचा निर्णय राखून ठेवला आहे.

शुक्रवारी ( दि. 25 फेब्रुवारी) मतदान झाले यानंतर सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली मतमोजणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे 10 पैकी 8 पदाधिकारी निवडून आले. तर कार्यकारणी सदस्य पदासाठी एकूण पंधरा जागांपैकी दहा उमेदवार निवडून आले. तर आपला महासंघ पॅनेलचा सुप्रिया सूरगुडे यांनी उप अध्यक्ष पदासाठी 2616 मते मिळवून विजय मिळवला. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे 25 पैकी 18 उमेदवार निवडून आले.

सविस्तर निकाल पुढील प्रमाणे

उपाध्यक्षपदासाठी मनोज माछरे यांना 2682, महादेव बो यांना 2608,
सरचिटणीस पदासाठी अभिमान भोसले यांना 2683,
चिटणीस पदासाठी मंगेश कलापुरे यांना 2615,
सहसचिव पदासाठी उमेश बांदल यांना 2665,
कोषापाल पदासाठी नितीन समगिर यांना 2640,
संघटक पदासाठी शुभांगी चव्हाण यांना 2702,
मुख्य संघटक पदासाठी दिगंबर चिंचवडे यांना 2615 मते मिळाली आहेत.

अध्यक्षपदाचा निर्णयाबाबत निवडणूक अधिकारी तुकाराम जाधव आज माहिती देणार आहेत.

Share This News

Related Post

पुणेकरांसाठी महत्वाची माहिती : डेक्कन व चतु:श्रुंगी वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक, पार्कींग व्यवस्थेत बदल

Posted by - February 13, 2023 0
पुणे : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने डेक्कन वाहतुक विभागाअंतर्गत चैत्राली को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड ते क्षितीज…

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ऐन सणासुदीच्या तोंडावर शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

Posted by - August 28, 2023 0
पुणे : पर्वती जलकेंद्र, पंपिंग, रॉ वॉटर, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एस. एन. डी. टी. वारजे जलकेंद्र, नवीन होळकर,…

शिवसेनेचे बये दार उघड अभियान; शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविली जाणार मोहीम

Posted by - September 25, 2022 0
देशात आणि राज्यात आदिशक्तीचा जागर असलेला नवरात्रीचा उत्सव सुरू होत असून विजयादशमीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची ऐतिहासिक सभा ही…

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा खिंडार! इरफान सय्यद एक हजार कार्यकर्त्यांसह करणार शिंदे गटात प्रवेश

Posted by - November 13, 2022 0
पिंपरी-चिंचवडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान सय्यद यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब…

मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्धरितीने युद्ध पातळीवर करा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वॉर रुम बैठकीत निर्देश

Posted by - August 29, 2022 0
मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर संबंधित विभागांनी काम करावे तसेच प्रलंबित बाबी,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *