Ajit Pawar And Sharad Pawar

NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर

375 0

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या उठावानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Crisis) मोठी फूट पडली. पक्षात दोन गट पडले. त्यानंतर दोन्ही गटाकडून पक्षाचं चिन्ह आणि पक्षाच्या नावावर दावा करण्यात आला. मात्र निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिल्याने अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं अधिकृत चिन्ह तसेच पक्षाचं नाव मिळालं.

तर दुसरीकडे शरद पवार गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलं असून तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे. यादरम्यान अजित पवार यांनी उठाव का केला? याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. यादरम्यान आता एक पत्र समोर आले आहे यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या पत्रामुळे पुन्हा एकदा पवार कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. या पत्रामध्ये अजित पवार यांनी उठाव का केला? पवार कुटुंबामध्ये फूट का पडली? याबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.बारामतीकरांची भूमिका नावानं हे पत्र व्हायरलं झालं आहे. पार्थ ऐवजी रोहितची निवड केल्यापासूनच अजितदादा आणि पवार कुटुंबीयातलं अंतर वाढत गेल्याचा दावा या निनावी पत्रात करण्यात आला आहे. मात्र पत्राच्या सत्यतेबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे.

ते पत्र खालीलप्रमाणे
News18

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी

Food Poisoning : खळबळजनक ! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत सापडले मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Share This News
error: Content is protected !!