पुणे- केंद्र सरकार अन्यायकारक पद्धतीने करत असलेल्या इंधन व डिझेल दरवाढीच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बालगंधर्व चौकात चूल पेटवून आंदोलन करण्यात आले. यावेळी चुलीवर भाकऱ्या भाजून निषेध करण्यात आला.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, संदीप बालवडकर, महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी, संतोष फरांदे, उदय महाले, काकासाहेब चव्हाण, संतोष नांगरे, गणेश नलावडे, दिलशान आतार, अनिता पवार, शिल्पा भोसले यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले, ” २०१४ साली महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांचे भांडवल करत भारतीय जनता पार्टी सत्तेत आली. सत्तेत आल्यानंतर मात्र ज्या सर्वसामान्य भारतीयांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेत बसवले, त्या सर्वसामान्य जनतेचा मात्र भाजपला विसर पडला आहे. निवडणुका आल्या की दर स्थिर ठेवायचे, निवडणुका गेल्या पुन्हा सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकायचा, हीच खरी भाजपची नीती आहे”
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आता भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. इथून पुढच्या काळात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारास पराभूत करत महागाई विरोधातला हा राग आपण व्यक्त करावा” असे आवाहन शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप यांनी या आंदोलन प्रसंगी केले.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी गॅस सिलेंडरला प्रतीकात्मक पद्धतीने फासावर लटकवण्यात आले.