अभिषेक बच्चन याच्या ‘दसवी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अमिताभ म्हणाला, ‘अभिषेकच आपला उत्तराधिकारी’

373 0

मुंबई- अभिषेक बच्चन आणि यामी गौतम स्टारर ‘दसवी’ या चित्रपटाचा ट्रेलर 23 मार्च रोजी रिलीज झाला आहे. अभिषेक बच्चनचे वडील अमिताभ बच्चन देखील ‘दसवी’चा ट्रेलर पाहून अभिषेकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिषेकच आपला उत्तराधिकारी असल्याचं त्यांनी म्हटलंय. सोशल मीडियावर त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

‘दसवी’ हा चित्रपट या वर्षातील सर्वात रोमांचक चित्रपट ठरणार आहे. अभिषेकला टिपिकल जाट नेत्याच्या भूमिकेत पाहणे चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. जाट नेता झालेला अभिषेक या भूमिकेत चांगलाच शोभून दिसतो. त्याची डायलॉग डिलिव्हरीही चांगली आहे. एकूणच हा चित्रपट अभिषेकच्या नवोदित कारकिर्दीत भर घालू शकतो. यामी गौतम या चित्रपटात एका बलाढ्य आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

‘दसवी’ या चित्रपटात गंगा राम चौधरीची कथा आहे, एक अशिक्षित, भ्रष्ट आणि देसी राजकारणी, ज्याला तुरुंगात ‘शिक्षण’ या नवीन आव्हानाचा सामना करावा लागतो. तुरुंगात त्याचा सामना कडक जेलर यामी गौतमशी होतो. तुरुंगातूनच दहावी उत्तीर्ण होणे हे त्याचे उद्दिष्ट आहे, त्यासाठी तो जोमाने अभ्यास करत असतानाच त्याची पत्नी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी उत्सुक आहे. एकूणच हा धम्माल सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Share This News

Related Post

Salt

Salt : महिनाभर मीठ खाणं बंद केलं तर…; तर तुम्हाला जाणवू शकतो ‘हा’ त्रास

Posted by - August 11, 2023 0
आपल्या जीवनात मिठाला (Salt) अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या जेवणाच्या प्रत्येक पदार्थामध्ये मीठ असल्याशिवाय आपण ते खात नाही. इतकंच नव्हे तर…
Nitin Desai

Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्याप्रकरणात मुलगी मानसी देसाईने केले खळबळजनक आरोप

Posted by - August 5, 2023 0
मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी 2 ऑगस्टला एनडी स्टूडिओत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 5 …

पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती नाही ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचं स्पष्टीकरण

Posted by - April 1, 2022 0
पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल…

आमिर खानने आपला मुलगा आझादसोबत घेतला आंबे खाण्याचा मनसोक्त आनंद !

Posted by - April 20, 2022 0
बॉलिवूडमध्ये मि. परफेक्शनिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे असा सुपरस्टार आमिर खानने अलीकडेच आपला मुलगा आझाद बरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *