पुणे : मंत्री शंभूराज देसाई यांनी सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेतलं दर्शन

297 0

पुणे : दरवर्षी प्रमाणे मी गणेशोत्सवामध्ये एक दिवस अभिषेकाला आणि आरतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणरायाच्या चरणी येत असतो, मागचे २ वर्ष कोरोनामुळे सर्व उत्सव बंद होते परंतु तरीसुद्धा गणेशोत्सवात मंदिराच्या बाहेरून गणराया दगडूशेठच दर्शन घेऊन जात होतो. आता यावर्षी हे सरकार आल्यानंतर आणि Covid- 19 कमी झाल्यानंतर उत्साहामध्ये आपण गणेशोत्सव संपूर्ण राज्यांमध्ये साजरा करतोय, प्रथेप्रमाणे मी आज माझ्या कुटुंबीयासह अभिषेकाला, आरतीला या ठिकाणी आलो होतो.

गणरायाच्या चरणी मी प्रार्थना केलीय की गणरायाच्या आशीर्वादाने कोरोनाच संकट दूर झालेलं आहे, परंतु २ वर्षाच्या कोरोना महामारीमुळं आर्थिक संकटामध्ये थोडस महाराष्ट्र राज्य सापडलेलं होतं परंतु शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा आर्थिक गाडा राज्याचं पूर्वपदावर आणायचं म्हणून आम्ही खूप चांगल्या उपाययोजना करतोय.

आर्थिक सुबत्ता महाराष्ट्र राज्याला प्राप्त व्हावी , देशातलं विकासाच्या बाबतीत आर्थिक सबळ असणारं पहिल्या क्रमांकाचं राज्य माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र व्हावा हीच प्रार्थना श्रीमंत दगडूशेठ गणरायाच्या चरणी केलेली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide