सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत महत्त्वाची – सत्र न्यायधीश संजय देशमुख

293 0

पुणे- लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा अग्रेसर असून सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत अत्यंत महत्त्वाची ठरते, जिल्ह्यात लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे निकाली निघतील, असा विश्वास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश तथा विधी सेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी व्यक्त केला.

जिल्हा व सत्र न्यायालयात आज राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा न्यायधीश एस.एस.गोसावी, जिल्हा न्यायधीश के.पी.नांदेडकर, न्यायधीश वेदपाठक, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर प्रताप सावंत, जिल्हा सरकारी वकील एन.डी.पाटील, पुणे वकील बार आसोसियशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे, न्यायाधीश, वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, “लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. मतभेद असू शकतात पण मनभेद नसावेत. भविष्याचा विचार करून कोर्टात वेळ व पैसा न घालवता वाद सामंजस्याने मिटवावे असा सल्ला त्यांनी दिला. तसेच लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा आपले अग्रेसर स्थान कायम ठेवेल” असेही ते म्हणाले.

नांदेडकर म्हणाले, “लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणांचा निपटारा गतीने करू शकल्यामुळे लोक अदालतीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. गतवर्षी लोक अदालतीमध्ये पुणे जिल्ह्याने देशात यश मिळवले. आजच्या लोक अदालतीच्या यशाचीही नोंद होईल. आजच्या लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे निकाली कसे निघतील यासाठी प्रयत्न करावे” असे आवाहनही त्यांनी केले.

सावंत म्हणाले, “लोक अदालतीमध्ये पुणे येथील ५० हजारापेक्षा जास्त प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व २ लाखापेक्षा अधिक, ई-चलन ११ लाखापेक्षा अधिक प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुण्यात ६० पॅनल उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ७ ते ११ मार्च या कालावधीत छोट्या गुन्ह्यातील १७ हजारापेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या पुणे जिल्हा लोक अदालतीची दखल जागतिक बँकेने व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने घेतली असून याबाबत एकत्रित अभ्यास करून डाटा संकलनाचे काम सुरू आहे. विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी याबाबतचे काम करत आहेत”

 

Share This News

Related Post

इतर मागास वर्गीय समाजावरील अन्यायाविरुद्ध पेटून उठा – नाना पटोले

Posted by - March 29, 2022 0
इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) विविध मागण्या केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत पण केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करुन…

मोबाईल युगात मुलांवर मौजीबंधनाचे संस्कार महत्वाचे – संदीप खर्डेकर

Posted by - May 10, 2023 0
मोबाईल युगात मुलांवर मौजीबंधनाचे संस्कार महत्वाचे असून लहान वयातील संस्कार आजन्म उपयोगी पडतात असे भाजपचे राज्य प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले.…
Ajit Pawar

काम केले नाहीतर तर कानाखाली देईन; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना झापलं

Posted by - June 5, 2023 0
पुणे : आज अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी त्यांनी भरसभेत संवाद साधत असताना कार्यकर्त्यांना झापलं आहे. यावेळी…

साऊथ सुपरस्टार ‘ पुष्पा फेम ‘ अल्लू अर्जुनचा आणखी एक विक्रम

Posted by - January 25, 2022 0
ऑरमॅक्स मीडियाचा साउथ स्टार्सचा मासिक अहवाल समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने पहिल्यांदाच महेश बाबूला मागे टाकले…
Maratha Reservation

Maratha Reservation : OBC समाज आक्रमक ! पुण्यात मराठा आरक्षणाबाबत काढलेला GR जाळला

Posted by - January 30, 2024 0
पुणे : पुढच्या काही दिवसांत ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात आरक्षणावरून (Maratha Reservation) मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *