Lalit Patil

Lalit Patil : ‘ललित पाटीलचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो’, ‘या’ आमदाराने केला थेट आरोप

1518 0

पुणे : ‘ललित पाटीलचा (Lalit Patil) कधीही एन्काऊंटर होऊ शकतो. एवढा मोठा गुन्हा घडून देखील पोलिसांवर किंवा ससूनच्या डिनवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हे मोठे रॅकेट असून यामध्ये राजकीय मंडळींचा देखील सहभाग आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करण्यात वेळ काढूपणा करत आहेत’, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात रवींद्र धंगेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती यावेळी त्यांनी हे आरोप केले आहेत.

काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
ललित पाटील कसा पळाला, हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. ससूनचे डीन काही यात बोलत नाही. कुणीच काही कारवाई करत नाही. पोलीस फक्त ललित पाटील याची जमा केलेली संपत्ती फक्त मोजदाद करत आहे. या पलीकडे काहीच काम करत नाही. या प्रकरणामध्ये मोठी राजकीय नेते आहे, आजी माजी पोलीस अधिकारी आहे. मला तर अशी भीती वाटतेय की ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो, असा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला आहे.

Share This News
error: Content is protected !!