Crime News

Crime News : नात्याला काळिमा ! अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी सख्ख्या बहिणींचीच केली हत्या

656 0

अलिबाग : अलिबागमधून भाऊ – बहिणींच्या नात्याला काळिमा फासणारी घटना (Crime News) समोर आली आहे. मालमत्तेचा हव्यासापोटी रक्ताचीच नाती जीवावर उठतात. यामध्ये भावानेच सख्ख्या बहिणींचा जीव घेतला आहे. मालमत्तेच्या लालसेतून भावानेच सख्ख्या बहिणींचा काटा काढला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना अलिबाग तालुक्यातील रेवदंडा या ठिकाणी घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
सोनाली मोहिते आणि स्नेहा मोहिते अशी या मृत बहिणींची नावे आहेत. तर गणेश मोहिते असे आरोपी भावाचे नाव आहे. आपल्या बहिणींची हत्या करण्यासाठी त्याने अत्यंत थंड डोक्याने कट रचला होता. आरोपी गणेश मोहिते याने बहिणींचा काटा काढण्यासाठी सुपात उंदीर मारण्याचे विष टाकून ते दोघींना प्यायला दिले. त्यात दोघींचाही मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी बहिणी संमती पत्र देत नव्हत्या. याचा राग गणेशच्या मनात होता. यातूनच त्याने ही हत्या केली आहे.

धक्कादायक म्हणजे, गणेशने कट रचण्यापूर्वी गुगलवर सर्च करुन सर्व माहिती देखील मिळवली होती. कोणते विषारी औषध जेवणातून व पाण्यातून दिले तर वास येणार नाही याची खात्री करण्यासाठी साधारण 53 वेळा गुगलवरुन माहितीदेखील घेतली होती. या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न गणेशने केला. मात्र पोलिसांनी कसून तपास करून या प्रकरणाचा उलघडा केला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी गणेशला अटक केली असून त्याला 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!