गिरीश बापट यांनी थेट आयुक्त विक्रमकुमार यांच्या घरावर धडक देत त्यांच्या घरातील पाण्याचा प्रेशर तपासले. यावेळी गिरीश बापट म्हणाले, शहरात सर्वत्र समान पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. याबाबत आयुक्तांशी चर्चा केल्या नंतर शहरात महापालिका 5 झोन तयार करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी टेक्निकल टीम नेमण्यात येणारं असून त्यांचे संपर्क क्रमांक लवकर घोषित करणार आहे. आणि या सर्वांवरएक अतिरिक्त आयुक्त यावर लक्ष ठेवतील असे बापट यांनी सांगितले.
तसेच शहरामध्ये 24 तास पाण्याच्या लाईन टाकण्याचे काम सुरू असून सर्वपक्षीय नगरसेवक यासाठी सहकार्य करतील असे अपेक्षा आहे. पुढील दोन दिवसात पाणी प्रश्न काही प्रमाणात कमी होईल. असे आश्वासन मला आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले आहे असे खासदार गिरीश बापट पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
खासदार गिरीश बापट म्हणाले, पाणी पुण्यात दोन दिवसात भेटते की नाही यासाठी आम्ही लवकरच एक समिती स्थापन करणार आहोत त्या समितीमध्ये पाच जण असणार आहेत. ती समिती उद्या आम्ही जाहीर करू असे गिरीश बापट म्हणाले.