वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई ; राज्य सरकारने लागू केला मेस्मा कायदा

187 0

राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते,तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी व कामगार यांनी आज रविवारी रात्री १२ वाजल्यापासून दोन दिवसीय (२८ आणि २९ मार्च) संपावर जाण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अर्थात मेस्मा कायदा लागू केला असून हा प्रस्तावित संप करण्यास मनाई केली आहे.

महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या शासनाच्या वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवा या अत्यावश्यक सेवा असून या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम अर्थात *मेस्मा* लागू करून त्यांना संपावर जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे राज्य शासनाने आज राजपत्रात प्रसिद्ध आदेशात म्हटले आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यापूर्वीच राज्यातील वीज कंपन्यांचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नाही,अशी ठाम भूमिका वेळोवेळी घेतली आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या वीज क्षेत्राच्या खासगीकरणाच्या प्रयत्नांनाही राज्याच्या ऊर्जा विभागाने, राज्य सरकारने तीव्र विरोध केला आहे. उन्हाळ्यातील वाढलेले तापमान,१० आणि १२ वीच्या परीक्षा,विविध पीकांना पाण्याची असलेली गरज या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला अखंड वीज पूरवठा मिळावा म्हणून वीज कंपन्यांच्या अधिकारी- कर्मचारी यांनी संपावर जाऊ नये असे आवाहनही यानिमित्ताने राज्य शासनाने केले आहे.

Share This News

Related Post

महाराष्ट्रातील 3 हजार कोटी रूपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - November 26, 2022 0
नवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्याला भांडवली गुंतवणुकीसाठी सन 2021-22 साठी 15 हजार कोटीं रुपयांचे विशेष सहाय्य केले होते. त्यामध्ये…

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार

Posted by - March 11, 2022 0
आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प…

आदित्य ठाकरे आज नाशिक आणि पुणे दौऱ्यावर; अतिवृष्टीग्रस्त भागांना देणार भेट

Posted by - October 27, 2022 0
पुणे : परतीच्या पाऊस आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद…

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केली आयोध्यातील निर्माणाधीन राम मंदिराची पाहणी

Posted by - April 9, 2023 0
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयोध्या दौऱ्यावर असून या आयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येत निर्माण होत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *