पुणे जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत १९ ते २१ जुलै दरम्यान जनसुनावणी

219 0

पुणे : राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात १९ ते २१ जुलै दरम्यान जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड येथे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर स्वत: तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.

पुणे शहर भागातील तक्रारींची जनसुनावणी १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. पुणे ग्रामीण मधील तक्रारींवर २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुनावणी घेण्यात येणार आहे. २१ जुलै रोजी ज्ञानज्योती सावित्री बाई फुले स्मारक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेजवळ पिंपरी-चिंचवड भागातील तक्रारींची जनसुनावणी सकाळी ११ वाजता होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!