पुणे । पुण्यात HSRP नंबरप्लेट वितरित करणारं एक केंद्र परस्पररित्या बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. कुठलीही पूर्व कल्पना न देता केंद्र बंद का करण्यात आले ? आता आमची नंबरप्लेट कुठे मिळणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दरम्यान, एका नागरिकाला आलेला अनुभव त्याने सांगितला. उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्यासाठी ऑनलाईन घेतलेल्या अपॉइंटमेंटनुसार अनेक नागरिक पुण्यातील संबंधित केंद्रावर गेले. मात्र त्याठिकाणी केंद्र बंदची नोटीस लावण्यात आली आहे. ७ मार्च नंतरच्या नंबर प्लेट बसवण्याच्या सुविधा रद्द करण्यात आल्या आहेत असं त्यावर म्हटलं आहे. यासंदर्भात कोणतीही माहिती खुलासे स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्या ठिकाणी केवळ एकच व्यक्ती उपस्थित होता मला या संदर्भात काहीही माहिती नाही बाहेर लावलेली नोटीस वाचा आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करा असेच तो सांगत होता. वरील नोटीशीवर हेल्पलाइन क्रमांक देण्यात आले आहेत. दोन-तीन तास प्रयत्न केल्यानंतरही हेल्पलाइन क्रमांकाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ते क्रमांक सातत्याने बिझी लागत होते. अखेर एका क्रमांकावर संपर्क साधण्यात यश आले. तुम्हाला नवीन वितरकाबाबत येत्या दोन ते तीन दिवसात माहिती देण्यात येईल असं सांगण्यात आल्याचा अनुभव एका व्यक्तीला आला आहे. या केंद्रावर नेमकं काय पाहायला मिळालं ? पाहुयात.
