सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने, उपाध्यक्षपदी नितीन राऊत

444 0

पुणे- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट प्रस्थापित सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने आणि उपाध्यक्ष म्हणून नितीन राऊत यांची नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली.

रासने बॅंकेचे ज्येष्ठ संचालक असून, सन २००९ ते २०११ या कालावधी त्यांनी बॅंकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या कारकिर्दीत बॅंकेने ‘नॉन परफॉर्मिंग ॲसेटस’चे (एनपीए) प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळविले होते. रासने महापालिकेच्या स्थायी समितीचे सलग चार वेळा अध्यक्ष होते. महापालिकेला कोरोना काळातही विक्रमी महसूल उत्पन्न जमा करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख म्हणूनही रासने कार्यरत आहेत.

अध्यक्षपदी निवड झाल्यावर रासने म्हणाले, “सुवर्णयुग बॅंकेची स्थापना २ ऑक्टोबर १९७३ रोजी झाली. सध्या बॅंकेच्या २२ शाखा आणि मुख्यालय आहे. बॅंकेचा व्यवसाय १३३५ कोटी रुपये असून, ८०९ कोटी रुपयांच्या ठेवी आणि ५२६ कोटी रुपयांची कर्जे आहेत. येत्या आर्थिक वर्षात बॅंक सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. नजिकच्या काळात बॅंकेचा शाखा विस्तार ५० पर्यंत आणि व्यवसाय पाच हजार कोटी रुपये करण्याचा निर्धार आहे. तसेच एनपीए शून्य टक्के करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. बॅंकेच्या मुख्यालयाची स्वतंत्र आणि भव्य वास्तू साकारणार आहोत”

नवनिर्वाचित उपाध्यक्ष नितीन राऊत यांना बॅंकिंग कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. ट्रस्टच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि क्रीडा उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. शाहुराज हिरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

Share This News

Related Post

लता मंगेशकर का राहिल्या आजीवन अविवाहित ? वाचा अधुरी एक प्रेम कहाणी

Posted by - February 6, 2022 0
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मागील दिवसांपासून त्या ब्रीच कँडी उपचार घेत होत्या. अखेर आज…
Breaking News

#PUNE : कसबा पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी ! केंद्रीय निवड समितीकडे ‘या’ 5 नावांचा प्रस्ताव

Posted by - January 27, 2023 0
पुणे : कसब्याच्या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच लक्ष लागल आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या केंद्रीय निवड समितीकडे 5 नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.…

पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून मिळाली धक्कादायक माहिती

Posted by - July 23, 2023 0
पुणे- पुणे शहरात पोलिसांनी (Pune Police)दोन दहशतवाद्यांना मंगळवारी अटक केली होती. हे दहशतवादी दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. या…

‘प्रवीण मसालेवाले’चे संस्थापक ज्येष्ठ उद्योजक हुकमीचंद चोरडिया यांचं निधन

Posted by - June 3, 2022 0
पुणे- ‘प्रवीण मसालेवाले’ या लोकप्रिय ब्रँडचे संस्थापक सुप्रसिद्ध उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया (वय ९२) यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं.…
Kantara 2 First Look

Kantara 2 First Look : ऋषभ शेट्टींच्या ‘कांतारा 2’चा फर्स्ट लूक व्हायरल

Posted by - November 27, 2023 0
मुंबई : देशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘कांतारा’ या सिनेमाची जादू आजही प्रेक्षकांवर आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत कांताराच्या दमदार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *