पुणे : अनंत चथुदर्शीला गणपती विसर्जनावेळी (Pune Ganpati Visarjan) पुण्यातल्या वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आज विसर्जनावेळी पुण्यातले वाहतूक बदल आणि पोलीस बंदोबस्त याबद्दल माहिती दिली आहे.
काय म्हणाले पोलीस आयुक्त रितेश कुमार ?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी 9 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तसंच 3,865 गणेश मंडळांचे विसर्जन असणार आहे. यासाठी मध्यवर्ती भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याचे रितेश कुमार यांनी सांगितलं आहे. तसेच गणपती विसर्जनाच्या मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.
विसर्जनाच्या दिवशी पुण्यातले कोणते रस्ते असणार बंद?
शिवाजी रोड
लक्ष्मी रोड
बाजीराव रोड
कुमठेकर रोड
गणेश रोड
केळकर रोड
टिळक रोड
शास्त्री रोड
जंगली महाराज रोड
कर्वे रस्ता
फर्ग्युसन रोड
भांडारकर रस्ता
पुणे सातारा रोड ( व्होल्गा चौक ते जेधे चौक)
सोलापूर रोड
प्रभात रोड
बगाडे रोड
गुरुनानक रोड