BREAKING NEWS: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी गोळीबार! वाळू व्यावसायिकावर झाडल्या गोळ्या; नेमकं कारण काय ? वाचा सविस्तर

221 0

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यातील एका वाळू व्यावसायिकावर गोळीबार झाल्याचे घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या या व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ती घटना पुण्यातील गंगाधाम परिसरामध्ये घडली.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनास्थळावरून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गंगाधाम परिसरामध्ये हे वाळू व्यावसायिक आले असता त्यांच्यावर दोन ते तीन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. या तरुणांनी दोन राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान संबंधित व्यावसायिक हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर हा हल्ला पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांची पथकं आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत.

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून भर चौकात, रहदारीच्या रस्त्यावर हा हल्ला झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Share This News
error: Content is protected !!