माळुंगा गावाला तातडीची मदत ; पुणे महापालिकेची तातडीची मदत

249 0

पुणे : पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट म्हाळुंगे गाव येथे मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे सुमारे २० ते २५ घरे पाणी शिरल्यामुळे बाधित झाली होती. त्यामुळे औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून त्वरित ३ जेसिबी व दोन पंपाच्या साह्याने पाण्याचा निचरा करून सदर घरे सुरक्षित केली गेली.     

           या कामाची पाहणी मा.अतिरिक्त आयुक्त विलास कानडे,उपायुक्त नितीन उदास यांनी केली आणि सदर काम महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे ,उपअभियंता संजय आदीवंत यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुरेंद्र जावळे,मोकादम प्रकाश सोवळे, आकाश शिंदे,भाऊ जाधव व सर्व महापालिका औंध येथील अधिकारी व कर्मचारी यांनी कमीतकमी वेळात कामपूर्ण केले.

Share This News
error: Content is protected !!