पुणे : ‘कीर्तने अँड पंडित’तर्फे शहरात ‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ ध्वज संकलन अभियान राबविण्यात आलं. स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी रस्त्यावर इतरत्र पडलेले ध्वज संकलित करण्यात आले.
कर्वे रस्त्यावरील कीर्तने अँड पंडित एलएलपी सीए फर्मतर्फे मंगळवारी सकाळी कर्वे रस्ता, पौड रस्ता, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्ता यासह शहराच्या विविध भागात हे ध्वज संकलन अभियान राबवले.
‘कीर्तने अँड पंडित’चे पार्टनर सीए मिलिंद लिमये यांच्या नेतृत्वात जवळपास १०० लोकांनी यात सहभाग घेतला. यामध्ये सीए, आर्टिकलशिप करणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. हे सर्व ध्वज भारत फ्लॅग फाउंडेशनकडे सुपूर्त केले जाणार आहेत.