रायगड : रायगडावर (Raigad) मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा (350th coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj) आज तिथीनुसार साजरा करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबईतील कोस्टल रोडला (Coastal Road) छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येणार, तसेच प्रतापगड प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आणि शिवसृष्टीसाठी 350 कोटी रुपये देण्यात येणार आहे.
यावेळी या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत यांच्यासह शेकडो मंत्री आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी यावेळी ऑनलाईन संवाद साधत शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पारंपारिक पद्धतीने पूजाविधी करण्यात आला. संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.
शिवसृष्टीसाठी (Shiva Shrishti) 50 कोटी
मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच प्रताप गडाच्या संवर्धनासाठी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली. या प्राधिकरणाचे अध्यक्ष उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) असतील. तर शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटी रुपये देण्यात येणार आहे.
शिवसंकल्प पूर्ण करणार
शेतकऱ्यांसाठी नमो कल्याण योजना सुरु करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु आहे. महिलांसाठी अनेक योजना सुरु करुन महिलांना सन्मान दिला आहे. गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर भर देण्यात येणार आहे. जनकल्याणाचा शिवसंकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. शिवरायांच्या कल्पनेतील सुराज्य आणणार आहोत, असेदेखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.