तळेगावात नागरिक एकवटले ! किशोर आवारे खून प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी

748 0

पुणे : पुणे येथील तळेगाव या ठिकाणी भरदिवसा 12 मे रोजी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे (Kishore Aware) यांच्यावर गोळीबार करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी किशोर आवारे यांच्या आई, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आमदार सुनील शेळके(Sunil Shelke), सुधाकर शेळके(Sudhakar Shelke), संदीप गराडे, श्याम निगडकर (रा. तळेगाव दाभाडे) आणि श्याम याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता एक धक्कादायक माहिती समोर आली होती. पोलिसांनी या हत्येप्रकरणी गौरव भानू खळदे (रा. तळेगाव)(Gaurav Bhanu Khalde) याला अटक केली आहे. माजी नगरसेवक भानू खळदे (Bhanu Khalde) आणि किशोर आवारे यांचा जुन्या नगरपरिषद इमारतीच्या आवारात वाद झाला होता. त्यावेळी आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचा राग मुलगा गौरव याच्या मनात होता. त्यातूनच त्याने इतर आरोपींना किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. यानंतर आता या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यासाठी नागरिकांनी मोर्चा काढला आहे.

Share This News

Related Post

NCP

Sharad Pawar on Raj Thackeray: रेल्वे इंजिनाची दुटप्पी भूमिका अखेर स्पष्ट; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची टीका

Posted by - March 19, 2024 0
पुणे : भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Sharad Pawar on Raj Thackeray)…

महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या पुण्यात ध्वजारोहण

Posted by - April 30, 2022 0
पुणे- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त रविवारी 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस संचलन मैदान, शिवाजीनगर…

माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार राहा, चंद्रकांत पाटील यांना इशारा

Posted by - May 27, 2022 0
पुणे – खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
Beed News

Beed News : बीड हादरलं ! डोक्यात दगड घालून शाळेतील शिपायाची निर्घृणपणे हत्या

Posted by - July 21, 2023 0
बीड : सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. बीडमधून (Beed News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये शाळेतील…
Firing

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरवस्तीत केली फायरिंग

Posted by - May 8, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Firing) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुणे हादरलं आहे. यामध्ये वारजे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *