पुणेकरांसाठी आजचा रविवार राजकीय वार ठरला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 31 विकासकामांची लोकार्पण,भूमिपूजन तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 10 विकासकामांची लोकार्पण, भूमिपूजन सोहळा संपन्न झाले.
यातील एक भाग असणाऱ्या नळस्टॉप येथील पुण्यातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पाटील यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत ही बाईकवर प्रवास केला.
यावेळी बोलताना कोथरुडकरांसाठी आज सोन्याचा दिवस आहे. कारण वर्षोनुवर्षे कर्वे रोड वरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा ही कोथरुडकरांची इच्छा आज पूर्ण होत असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केलं