माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कौटुंबिक कारणाने उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.
त्यांच्या खाजगी वाहनात केअरटेकर व नोकरांसह बसवून रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार श्रीमती काकडे यांची प्रकृती स्थिर आहे.
दुपारी चार वाजून 57 मिनिटांच्या सुमारास च्य पोलिसांना श्रीमती उषा काकडे या गंभीर अवस्थेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठांनी तात्काळ माहिती बाबत खात्री करण्याच्या सूचना दिल्यानंतर, एक टीम १६:३६ वाजता त्यांच्या राहत्या घरी पोहोचली. काकडे अस्वस्थ अवस्थेत आढळल्या. तत्काळ त्यांना त्यांच्या खाजगी वाहनात केअरटेकर व नोकरांसह बसवून रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार श्रीमती काकडे यांची प्रकृती स्थिर आहे. सदर प्रकरणावर लक्ष ठेवले जात असून, आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.