Sasoon Hospital Scam: पुण्यातील ससून रुग्णालयात तब्बल 4 कोटींचा घोटाळा

167 0

पुणे: पुण्यातील ससून रुग्णालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. ललित पाटील ड्रग्स प्रकरण, पोर्शे कार, रुग्णांची हेळसांड अशा कितीतरी प्रकरणामुळे ससून रुग्णालययातील गैरकारभार चव्हाट्यावर आला होता.

कर्मचाऱ्यांनी चक्क रुग्णालयाच्या 4 कोटी 18 लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. हा गैरप्रकार लक्षात येताच ससुनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

त्यांच्या तक्रारीवरून बंड गार्डन पोलिसांनी रुग्णालयातील 16 कर्मचारी आणि 7 खाजगी व्यक्ती अशा एकूण 23 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!