गणेश उत्सवाची मंगळवारी सांगता होणार असून पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
गणेश उत्सवाची मंगळवारी अनंत चतुर्दशीला सांगता होणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज झाला असून प्रशासनाकडून गणेश विसर्जनाची मिरवणूक संपेपर्यंत 6000 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पुण्याला गणेश उत्सवाची वैभवशाली परंपरा असून दरवर्षीप्रमाणे लक्ष्मी रस्ता कुमठेकर रस्ता केळकर रस्ता आणि टिळक रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक निघणार आहे ते पाहण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहायुक्त रंजनकुमार शर्मा विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्ताची आखणी करण्यात आली. गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळी सात पासून पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी हजर राहणार आहे पुणे शहर पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाची अर्थात एस आर पी एफ कंपनी, गृहरक्षक दलाचे जवानही कार्यरत असणार आहेत. विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या चोरीच्या घटना टाळण्यासाठी साध्या वेशातील पोलीसही गस्त घालणार आहेत
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कसा असणार बंदोबस्त
अतिरिक्त पोलीस आयुक्त 4
पोलीस उपयुक्त 10
सहाय्यक पोलीस आयुक्त 25
पोलीस निरीक्षक 136
पोलीस उपनिरीक्षक 653
पोलीस अंमालदर 5700
एसआरपीएफ 1
होमगार्ड 400
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चौका चौकातही उभारलेल्या मनोऱ्यावरूनही पोलीस देखरेख करणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही विसर्जन मिरवणुकीवरही करडी नजर ठेवली जाणार आहे.