राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीकाटिप्पणी करत असतानाच आता काँग्रेसच्या महिला नेत्याने देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला ठेच पोहोचली अशी टीका काँग्रेस नेत्या, राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री तिवसा विधानसभा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
नुकतीच यशोमती ठाकूर यांनी बोल भिडू या वाहिनीला मुलाखत दिली त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल यशोमती ठाकूर यांनी हे विधान केलं.
2014 पर्यंत देवेंद्र फडणवीस यांचा राजकारण हे जनसामान्यांसाठी होतं मात्र 2019 नंतर देवेंद्र फडणवीस यांचा राजकारण बदललं यामागे देवेंद्र फडणवीस यांची नेमकी काय मजबुरी आहे हे माहिती नाही असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या