Bhor News : भोर विधानसभा मधील भाविकांसाठी काशी देवदर्शनाचे आयोजन

612 0

पुणे : भोर विधानसभा (भोर वेल्हा- मुळशी ) (Bhor News) मधील भाविकांसाठी काशी देवदर्शनाचे आयोजन केले होते.या देवदर्शनासाठी जवळपास तीन हजार नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून काशी धामचा झालेला विकासरूपी कायापालट पाहून सर्व भाविक प्रसन्न झाले.

यावेळी क्रेनच्या सहायाने 1000 किलोचा हार घालून व जेसीबी ने फुलांची उधळण करुन पालकमंत्री ना श्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मुळशी तालुक्यात स्वागत केले.तसेच काशी विश्वनाथ दर्शन घेऊन परतलेल्या भाविकांसाठी गंगा पूजन व महाप्रसादाचे आयोजन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.

यावेळी आदरणीय नरेद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मेरी माटी, मेरा देश या उपक्रमअंतर्गत मातीला नमन वीरांना नमन केले. या प्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री राजेश पांडे, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक व सिनेअभिनेते श्री प्रवीण तरडे,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री वासुदेव नाना काळे,कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी,नगरसेवक श्री अमोल बालवडकर, नगरसेविका कल्पनाताई गणेश वर्पे, भाजपा जिल्हा महिलाआघाडी स्नेहलताई दगडे पाटील, मुळशी भाजपा तालुकाध्यक्ष विनायक ठोंबरे, भोर भाजपा तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, वेल्हा भाजपा तालुकाध्यक्ष सुनील जागडे,आदी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!