मुंबई : येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अविनाश भोसले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक लाखांच्या जामीनावर त्यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अविनाश भोसले यांना 26 मे 2022 रोजी येस बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केली होती.
काय आहे नेमके प्रकरण?
अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भोसले हे तुरुंगात आहेत. येस बँक आणि डिएचएफएल घोटाळा प्रकरणात सीबीआयने त्यांना अटक केली होती. येस बँक-डीएचएफएल यांना अनियमीत कर्ज दिल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी देखील जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज शुक्रवारी अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Fire : पुण्यातील खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलला लागली आग
Pune News : बेकायदेशीर रित्या जमाव जमा केल्याने भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Maharashtra Rain : अवकाळी पावसासोबत वादळी वाऱ्याची शक्यता; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट
Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल