Ashish Bharti

Ashish Bharti : पुणे महानरपालिकेचे माजी आरोग्य प्रमुख आशिष भारती यांना सत्र न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

348 0

पुणे : पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती (Ashish Bharti), मेडिकल ऑफिसर डॉ. अरुणा सूर्यकांत तरडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये कोविड काळात 80 ते 90 लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता माजी आरोग्य प्रमुख आशिष भारती यांना सत्र न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा सगळा घोटाळा कोरोना काळात कै. अरविंद बारटक्के रुग्णालय वारजे या ठिकाणी घडला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या घोटाळ्याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात महापालिकेचे माजी आरोग्य अधिकारी सतीश बाबुराव कोळुसरे (वय 42, रा. पिंपळे गुरव, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली होती.

काय आहे नेमके प्रकरण?
या प्रकरणी आशिष भारती यांबरोबर मेडिकल ऑफिसर डॉ. अरुणा सूर्यकांत तरडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोविड काळामध्ये कै. अरविंद बारटक्के हॉस्पिटलमध्ये कोविड तपासणीसाठी लागणारे साहित्य पुरविण्यात आले होते. यामध्ये टेस्टिंग किट, सॅनिटायझर, औषधे यांचा समावेश होता. या सर्वांनी स्वतःच्या हितासाठी आणि स्वार्थासाठी अन्य साथीदारांना हाताशी धरून सरकारी कागदपत्रांमध्ये अनेक फेरफार केले. खोटी कागदपत्रे तयार करून खरी असल्याचे भासवले. ही कागदपत्रे महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिकेला सादर करून पैसे कमावण्याच्या हेतूने कोविड टेस्ट तपासणीसाठी येणाऱ्या लोकांच्या नोंदवहीमध्ये खोट्या नोंदी केल्या. नागरिकांसाठी आलेल्या टेस्टिंग किड्स वापरल्या असल्याचे भासविण्यात आले. यानंतर त्या टेस्टिंग किट प्रायव्हेट लॅब आणि खाजगी व्यक्तींना विकल्या. त्यामधून जवळपास 80 ते 90 लाख रुपयांची कमाई केली असे पोलिसांकडून सांगण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जैतापूरकर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर,’या’ दिवशी होणार मतदान

Posted by - July 8, 2022 0
राज्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 ऑगस्टला मतदान होणार असून,या निवडणुकीची प्रक्रिया 20…
Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - February 12, 2024 0
पुणे : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra…

प्रशासक म्हणून विराजमान झाल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा दणका

Posted by - March 16, 2022 0
पुणे- महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज प्रशासकपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. पहिल्याच दिवशी शहरातील पदपथ आणि मोकळ्या जागांवर बेकायदेशीररित्या…
RBI

RBI Threat : खळबळजनक ! मुंबईतील RBI चे मुख्यालय उडवून देण्याची मेलद्वारे देण्यात आली धमकी

Posted by - December 26, 2023 0
मुंबई : आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ई-मेल (RBI Threat) आल्यामुळे मुंबईतल्या आरबीआय ऑफिसमध्ये मोठी खळबळ उडाली. खिलाफत इंडिया या…

मोठी बातमी : दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडताय? पुणेकरांना थांबा ! बाजारपेठा वाहतूक कोंडीने तुडुंब

Posted by - October 15, 2022 0
पुणे : दिवाळी आता तोंडावर आली आहे. त्यानिमित्ताने खरेदीसाठी पुणेकर बाहेर पडले आहेत. भर बाजारपेठेमध्ये निमुळते रस्ते, त्यात नागरिकांनी चार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *