मुंबई : महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकार नवी योजना राबवणार आहे. त्याअंतर्गत महत्त्वाच्या शहरांत ‘पिंक रिक्षा’ (Pink rickshaw) ही योजना लवकरच सुरू करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आदिती तटकरे यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर याचं स्वागत करण्यात आले आहे.
.@MahaDGIPR निर्मित 'दिलखुलास' आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री @iAditiTatkare यांची चौथ्या महिला धोरणात महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच बेघर बालकांच्या संरक्षणासाठी कोणती धोरणात्मक पाऊले उचलण्यात आली आहेत यासंबंधीची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. pic.twitter.com/rUiPDWvKzT
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 24, 2023
राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ही योजना सूरू करणार असून प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या शहरांचा समावेश असू शकतो. महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलाविली होती. या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे.
राज्यातील प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सर्वसमावेशक असे बालधोरण महिला व बालविकास विभाग तयार करत आहे. जनतेच्या हरकती आणि सूचना मागवण्यासाठी विभागाने बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशा सूचनादेखील मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिल्या.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Weather Update: राज्यात आजही कोसळणार पाऊस; ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा
Dr. Vinayak Kale : ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती
Sanjay Raut : राज्यात नामर्दांचं सरकार, गद्दारांसाठी वेगळा कायदा; संजय राऊत यांची सरकारवर टीका
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी घातला टीपू सुलतानच्या फोटोला हार; Video व्हायरल
Wardha Accident : वर्ध्यात कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात
Viral Video : खतरनाक ! पिसाळलेल्या बैलाने घरात घुसून महिलांना उडवले