Sharad-Pawar-vs-Ajit-Pawar

Ajit Pawar : प्रत्येकाचा काळ…; अजितदादांची शरद पवारांवर नाव न घेता टीका

354 0

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना थेट शरद पवार यांना थेट आव्हान दिले. तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी इकडेही आणि तिकडेही असं चालणार नाही असे सुनावले आहे. ज्यांना माझ्यासोबत रहायचंय त्यांनी रहावं आणि तिकडे ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं असे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी मी 60 व्या वर्षी बंड केलं पण त्यांनी 38 व्या वर्षी केलं होतं असे म्हणत शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

काय म्हणाले अजित पवार?
माझ्या मागे विधानसभेतील 43, विधान परिषदेतील 6 आणि दोन अपक्ष आमदार उभा राहतात, म्हणजे माझी भूमिका त्यांना पटल्यानेच सर्व शक्य झालं. मी वयाच्या 60 व्या वर्षी ही भूमिका घेतली, तर काहींनी 38 व्या वर्षी ही भूमिका घेतली होती. वसंतदादा पाटलांना डावलून निर्णय घेतला गेला. म्हणजे यापूर्वी असे निर्णय़ घेतले नाही असे नाही. त्यामुळे तुम्ही मला पण समजून घ्यायला पाहिजे.

एक वर्ष चर्चा सुरू होती.. मी घेतलेला निर्णय योग्य होता म्हणून इतकी लोक माझ्यामागे आले. मी त्यांना काय दमदाटी केली का?भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आपल्यासोबत आहे. प्रत्येकाचा काळ असतो आणि वय जास्त झाल्यावर आपण घरातल्या लोकांनाही म्हणतो की तुम्ही आराम करा, आशीर्वाद द्या आणि मार्गदर्शन करा असं म्हणत पुन्हा एकदा अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Chandrakant Patil : कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! – चंद्रकांत पाटील

Nagpur News : नागपूर हळहळलं ! गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune Video : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; CCTV आले समोर

Pune Crime News : पुण्यामध्ये पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; हत्येमागचे ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

Tanaji Sawant Car Accident : कोल्हापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्याचा अपघात

IND Vs AUS Women Cricket : टीम इंडियाने इतिहास रचला ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच जिंकला कसोटी सामना

Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द; काँग्रेसला मोठा धक्का

Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या

WFI : केंद्र सरकारकडून भारतीय कुस्ती संघाचे निलंबन

Ajay Devgan : ‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणचा अपघात; दुखापतीमुळं चित्रपटाचं शूटिंग कॅन्सल

Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!