मुंबई : टीम इंडियाच्या महिलांनी आज इतिहास रचला आहे.मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात (IND Vs AUS Women Cricket) भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला आहे. भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावरील हा पहिला कसोटी विजय आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळवण्यात आला होता.
याआधी दोन्ही संघांमध्ये एकूण 10 सामने खेळले खेळवण्यात आले होते. यामध्ये 4 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले तर तर 6 सामने अनिर्णित राहिले होते. या सामन्यात स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग, स्नेह राणा,पूजा वस्त्राकर यांनी भारतासाठी चमकदार कामगिरी केली. भारतीय महिला संघाचा हा विजय दीर्घकाळ स्मरणात राहील.
𝙃𝙄𝙎𝙏𝙊𝙍𝙔 𝙄𝙉 𝙈𝙐𝙈𝘽𝘼𝙄! 🙌#TeamIndia women register their first win against Australia in Test Cricket 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/7o69J2XRwi#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/R1GKeuRa69
— BCCI Women (@BCCIWomen) December 24, 2023
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 219 धावांवर सर्वबाद झाला होता. ताहलिया मॅकग्रा ही अर्धशतक झळकावणारी एकमेव फलंदाज होती. भारताकडून पूजा वस्त्राकरने 4 आणि स्नेह राणाने 3 बळी घेतले. दिप्ती शर्मानेही दोन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या 219 धावांसमोर भारताने स्मृती मंदाना (74), ऋचा घोष (52), जेमिमाह रॉड्रिग्स (73) आणि दिप्ती शर्मा (78) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात 406 धावा केल्या होत्या.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द; काँग्रेसला मोठा धक्का
Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या
WFI : केंद्र सरकारकडून भारतीय कुस्ती संघाचे निलंबन
Ajay Devgan : ‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणचा अपघात; दुखापतीमुळं चित्रपटाचं शूटिंग कॅन्सल
Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण
Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी