मुंबई : अजय देवगण (Ajay Devgan) येणाऱ्या काळात ‘सिंघम 3’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात जबरदस्त स्टाईल आणि ऍक्शन सिक्वेन्स पाहायला मिळणार आहेत. अजय देवगण सगळे अॅक्शन सीन स्वतः करतो. त्याला त्यासाठी बॉडी डबल वापरणे देखील आवडत नाही. काही दिवसांपूर्वी सिंघम 3 च्या सेटवर एक अॅक्शन सीन शूट करताना अजय देवगणच्या डोळ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला होता. त्यानुसार अजय देवगणच्या दुखापतीमुळे सिंघम 3 चे शूट रद्द करण्यात आले आहे.
अजय अद्याप बरा झालेला नाही आणि चित्रपटाचे शूटिंग एका आठवड्यापूर्वी मुंबईत सुरू होणार होते. वृत्तानुसार, ‘आता टीम हैदराबादमध्ये सिंघम 3 चे शूटिंग आधी करू शकते कारण त्या तारखा आधीच निश्चित झाल्या आहेत. डिसेंबर 2023 मध्ये होणारे मुंबई शूट रद्द करण्यात आले आहे आणि आता 2024 च्या हैदराबाद शेड्यूलनंतर पूर्ण केले जाईल.सिंघम 3 च्या शूटिंगबाबत निर्माते किंवा अजय देवगणकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास रोहित शेट्टी दिग्दर्शित कॉप युनिव्हर्स सिंघम फ्रँचायझीचा तिसरा भाग मल्टीस्टारर असणार आहे. यामध्ये अक्षय कुमार, करीना कपूर खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ हे देखील झळकणार आहेत. सँबतच सिंघम 3 चित्रपटात अजय देवगणसोबत अर्जुन कपूर आणि श्वेता तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 2024 मध्ये आपल्या भेटीला येणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण
Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी
Coronavirus : देशात कोरोनाचा धोखा वाढला ! देशभरात 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण