पुणे- कोरोनाची मागील काही दिवसांपासून कमी होणारी रूग्णसंख्या लक्षात घेऊन पुण्यातील जंबो कोविड सेंटर 28 फेब्रुवारीपासून बंद करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
आज पुण्यात पुणे,पिंपरी-चिंचवड, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांनी ही माहिती दिली.
त्याचबरोबर किरीट सोमय्या यांनी ‘डर्टी डझन’ यादी जाहीर केली होती. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार याच नावही होतं. यावर कायद्याने नियमाने जी कारवाई व्हायची ती होईल. मला राज्याच्या विकासात रस आहे. मग आता मी काय तुरुंगात जाऊ का ? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.