ॲड. स्वप्ना खामकर पिंगळे यांची भाजपा कायदा आघाडीच्या सेक्रेटरीपदी निवड

289 0

मंचर- मंचर येथील विघ्नहर कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा महिला मेळावा संपन्न झाला. यावेळी भाजपा महिला कार्यकर्त्यां ॲड स्वप्नाताई खामकर पिंगळे यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कायदा आघाडीच्या सचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली.

भारतीय जनता पार्टीचे राज्य महिला सेक्रेटरी वर्षाताई डहाले, जिल्हा परिषद पुणे सदस्य आशाताई बुचके, ॲड. धर्मेद्रजी खांडरे संघटन सरचिटणीस भाजपा, भाजपा आंबेगाव तालुकाध्यक्ष डाँ. ताराचंद्र काराळे, तसेच जिल्हाध्यक्ष कायदा आघाडी भाजपा ॲड. संजय सावंत पाटील या सर्वाच्या हस्ते नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.

जागतिक महिला दिनानिमित्त मंचर शहरात भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका महिला मोर्चा तर्फे हळदी कुंकू व लकी ड्रॉ तसेच विविध क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्याना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, नुकतेच युक्रेन मधुन सुखरुप परत आलेल्या विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला, डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक व इतर सर्वच क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा सचिव सुवर्णा जोशी, आंबेगाव तालुका सरचिटणीस संदीप बाणखेले,भाजपा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष संजय थोरात, भाजपा मंचर शहर अध्यक्ष नवनाथ थोरात, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार, महिला मोर्चा अध्यक्षा आंबेगाव रुपालीताई घोलप आदी भाजपा जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

Share This News

Related Post

ओळख पाहू …. या चित्रात काय दिसतंय ? त्यावरून समजेल तुमची पर्सनॅलिटी

Posted by - April 13, 2023 0
तुमचे व्यक्तिमत्व, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचा स्वभाव कसा आहे हे ओळखण्याची एक पद्धत आहे. त्याला ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे भ्रमित…

PUNE CRIME कोल्हापूरचा ‘डॉक्टर डॉन’ इंदूरमधून गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या जाळ्यात

Posted by - October 14, 2022 0
पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातून एका व्यवसायिकाचे अपहरण झाले. या व्यवसायिकाकडून 20 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यासह बलात्काराचा खोटा…

दुर्दैवी घटना : सरकारी रुग्णालयात परिचारक झोपी गेला; आईला लागली झोप; एक महिन्याच्या बाळाला कुत्र्याने पळवले, सीसीटीव्ही फुटेजमुळे घटना उघडकीस

Posted by - February 28, 2023 0
राजस्थान : राजस्थानच्या शिरोही जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. राजस्थान मधील सिरोही जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील कुत्र्यांनी अवघ्या एक…

#PUNE : दारू पिऊन शिवीगाळ केली म्हणून शेजारच्या महिलांनी केली मारहाण; अपमान सहन न झाल्याने रिक्षाचालकाने संपवली जीवन यात्रा

Posted by - March 27, 2023 0
पुणे : विश्रांतवाडीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धानोरे परिसरात राहणाऱ्या एका रिक्षा चालकांन खाणीमध्ये उडी मारून आत्महत्या केली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *