मंचर- मंचर येथील विघ्नहर कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा महिला मेळावा संपन्न झाला. यावेळी भाजपा महिला कार्यकर्त्यां ॲड स्वप्नाताई खामकर पिंगळे यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कायदा आघाडीच्या सचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे राज्य महिला सेक्रेटरी वर्षाताई डहाले, जिल्हा परिषद पुणे सदस्य आशाताई बुचके, ॲड. धर्मेद्रजी खांडरे संघटन सरचिटणीस भाजपा, भाजपा आंबेगाव तालुकाध्यक्ष डाँ. ताराचंद्र काराळे, तसेच जिल्हाध्यक्ष कायदा आघाडी भाजपा ॲड. संजय सावंत पाटील या सर्वाच्या हस्ते नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.
जागतिक महिला दिनानिमित्त मंचर शहरात भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका महिला मोर्चा तर्फे हळदी कुंकू व लकी ड्रॉ तसेच विविध क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्याना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, नुकतेच युक्रेन मधुन सुखरुप परत आलेल्या विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला, डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक व इतर सर्वच क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा सचिव सुवर्णा जोशी, आंबेगाव तालुका सरचिटणीस संदीप बाणखेले,भाजपा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष संजय थोरात, भाजपा मंचर शहर अध्यक्ष नवनाथ थोरात, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार, महिला मोर्चा अध्यक्षा आंबेगाव रुपालीताई घोलप आदी भाजपा जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.