शिवसेना माजी आमदार महादेव बाबर यांच्यासह माजी नगरसेवक आणि ८ पोलिसांवर गुन्हा दाखल

625 0

पुणे:शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्यासह माजी नगरसेवक नारायण लोणकर यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नेत्यांसह ८ पोलीस कर्मचारी आणि कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्या विरुद्ध देखील ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,एका मासे विक्रेत्याने न्यायालयात या प्रकरणी दाद मागितली होती.”भारत बंद आहे,तुझे मासे विक्रीचे दुकान बंद कर”…अशी धमकी देत माजी आमदाराने शिवीगाळ केल्याप्रकरणी या मासे विक्रेत्याने पोलिसात धाव घेतली होती.त्या नंतर पोलीस स्थानकामध्ये देखील या मासे विक्रेत्याला पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी देखील मारहाण केली होती.
याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार माजी आमदार महादेव बाबर,माजी नगरसेवक नारायण लोणकर,अब्दुल बागवान,असलम बागवान,राजेंद्र बाबर,दीपक रमाने,सईद शेख,राजू सय्यद,गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते,पोलीस कर्मचारी कामठे,गरुड,नफाद सुभानवाड,सुरेखा बडे यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!